सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना चार अॅप्सपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे,
बँकेने ग्राहकांना माहिती देत सांगितले की, या चार अॅप्सपासून दूर राहा अन्यथा तुमचे खाते रिकामे होऊ शकते. चार महिन्यात स्टेट बँकेच्या 150 ग्राहकांना या अॅप्समुळे 70 लाखांहून अधिक नुकसान सहन करावे लागले आहे. फसवणूक करणारे गोष्टींमध्ये अडकतात आणि अॅप डाउनलोड करतात आणि खाते साफ करतात. दिवसंदिवस लोकांची होत असलेले फसवणूक आणि प्रकरण पाहाता, स्टेट बँकेने आपल्या खातेदारांना सांगितले की, त्यांनी AnyDesk, Quick Support, Teamviewer आणि Mingleview सारखे अॅप्स फोनमध्ये इंस्टॉल करु नयेत. एसबीआयने आपल्या खातेधारकांना युनिफाइड पेमेंट सिस्टमबद्दल सावध केले आहे आणि त्यांना कोणत्याही अज्ञात स्त्रोतांकडून यूपीआय पिन आणि क्यूआर कोड स्वीकारू नये असे देखील सांगितले आहे. त्याचबरोबर बँकेना सांगितले की, अज्ञात वेबसाइटवरून हेल्पलाईन क्रमांक घेऊन त्यावरुन फोन लावू नका. कारण SBI च्या नावाने अर्धा डझनहून अधिक बनावट वेबसाइट सध्या हॅकर्स वापरत असल्याचे बँकेने सांगितले आहेत. त्यामुळे केवळ अधिकृत वेबसाइटलाच भेट द्या आणि माहिती व्यवस्थित तपासल्यानंतरच शेअर करा. यामुळे तुमचे आणि दुसऱ्यांचेही नुकसान होणार नाही.