सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शासनाचे आदेशाचे उल्लंधन करुन डिझेलची साठवणुक केल्याप्रकरणी दोघाच्या विरोधात लोणंद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
खंडाळा गांवचे हदीत कमलसंपत्ती पेट्रोलिअमचे दक्षिणेस असणाऱ्या आण्णा सोनवलकर यांचे आरसीसी इमारतीमध्ये सुरज जालींदर शिंदे रा.तांबवे ता.फलटण, रोहन राजेंद्र वाईकर रा.तरडगांव ता.फलटण यांनी भाडयाने घेतलेल्या गाळयामध्ये विनापरवाना डिझेलचा साठा केल्याची माहिती मिळाल्यानंतर सपोनि विशाल वायकर , पो.ह.महेश सपकाळ, अविनाश नलवडे, विठ्ठल काळे,कॉ. आंधळे, महिला कॉ. नरुटे यांनी , मंडलाधिकारी सुरज पोळ यांचे समवेत छापा घातला असता
सुमारे एक लाख 35 हजार रुपये किमतीचा 1400 लिटर डिझेलचा साठा केला असल्याचे आढळुन आले.
ज्वलनशिल इंधन ठेवण्याचा परवाना नसताना ज्वलनशील इंधन डिझेल विक्री करण्याचे उदेशाने स्वत : चे कबज्यात बाळगुन शासनाचा कोणताही परवाना न घेता शासनाचे आदेशाचे उल्लंधन करुन डिझेलची साठवणुक करुन तसेच असुरक्षितरित्या लोकांच्या जिविताला व मालमत्तेला धोका निर्माण होईल अशा रितीने मिळुन आले.
या प्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये जिवनाश्यक वस्तु अधिनियम कलमा प्रमाणे दोघांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद पो.कॉ. विठ्ठल काळे यांनी दिली असून पुढील तपास हे.कॉ. अविनाश नलवडे करीत आहेत.