सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील गायकवाड वस्ती येथील घराचा दरवाजा तोडून चोरी करण्यात आलेले सोने व रोख रक्कम आज वडगाव निंबाळकर पोलिसांनी सांभतीतांना परत केली.
मागील वर्षा करंजेपूल येथे चोरी झाली होती या चोरी मध्ये सोमनाथ काळे यांच्या घरामधुन सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. २२ जून २०२०२ ला काळे यांनी फिर्याद दिली होती .
निंबाळकर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार यांनी व पोलिस टीमने कसून तपास करून या चोरीचा छडा लावला व मुद्देमाल हस्तगत केला. या दागिने ओळख पटवून घेत तक्रार दिनाचे औचित्य साधत हे दागिने फिर्यादी सोमनाथ काळे व पत्नी प्रतीभा काळे याना सुपूर्द करण्यात आले चोरीस गेलेले दागिने परत मिळाल्यामुळे काळे कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला.
COMMENTS