सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील खामगळवाडी येथील बेकायदेशीर उत्खनन बंद करा अन्यथा घंटानाद आंदोलन करण्यात येईल. याबाबत पणदरे येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे यांनी भारताचे मा. राष्ट्रपती, मा. पंतप्रधान, बाळासाहेब थोरात महसुल मंत्री, सचिव महसुल विभाग, उपविभागीय अधिकारी बारामती यांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत विक्रम कोकरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वारंवार लेखी तक्रार तसेच फोनव्दारे व समक्ष भेटून देवून देखील संबंधीत प्रशासनाने या बेकायदेशीर गौणखनिज उत्खननास पाठींबा दिलेला आहे. गावकामगार तलाठी ढाकाळे (खामगळवाडी) व लोणीभापकर सर्कल यांनी तक्रार केल्यानंतर १५ दिवसांनी पंचनामा कला त्या पंचनाम्या मध्ये बेकायदेशीरपणे गौणखनिज उपसा २८ हजार ब्रास केल्याचे निदर्शनास आले. तरी देखील संबंधीत तहसिलदार यांनी कायदेशीर कारवाई करणे तात्काळ अपेक्षीत असताना देखील त्यांनी कोणतेही ठोस अशी कारवाई केलेली नाही उलट त्या गौणखनिज उत्खनन करणाच्या खत्री कन्स्ट्रक्शन त्यापेक्षाही मोठया प्रमाणात उच्छाद मांडला. यावरून असे निदर्शनास येते की संबंधीत अधिकारी यांचे आर्थिक हित जोपासण्याचे काम तर चालू ना? असे या वरून निदर्शनास येते. शासनाचे कोटयावधी रुपयांचा महसूल बुडवून संबंधीत व्यक्ती ही बेकायदेशीरपणे मालमत्ता कमवित आहे. त्याचबरोबर त्याच व्यक्तीची व संबंधीत अधिकारी यांची सी.बी.आय. मार्फत कमविलेल्या संपत्तीची व संबंधीत अधिकारी यांची खातेनिहाय सखोल चौकशी करून शासनाचे होणारे नुकसान भावावे व संबंधीत गौणखनिज उत्खनन करणारे ठेकेदार यांचेवर फौजदारी वसुलपात्र गुन्हे दाखल करून शासनाचा नियमाचा भंग केल्याने त्यांच्यावर देखील कडक कारवाई करावी.
अशाच प्रकारे दुसन्या ठिकाणी खामगळवाडी ग.नं. ४६ मध्ये देखील मंजूरी देवून गट नं.४७ मध्ये बेकायदेशीरपणे बेसुमार गौणखनिजाचा उपसा केलेला आहे. त्यावर देखील इटीएस मोजणी होवून कारवाई व्हावी. संबंधीत प्रकरणात आमच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तरीही आम्ही लोकशाही मार्गाने देश हितासाठी कोटयावधी रूपये चोरी होत असणारी शासनास मिळवून देत आहोत. तरीही शासन गांभीर्याने दखल घेवून उचीत कारवाई करीत नाही. त्यामुळे संबंधीत खाणीमध्ये आमी असंख्य युवक कार्यकत्यांसह एक दिवशीय घंटानाद आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.