धक्कादायक ! महसूल मंत्र्यांच्या बनावट आदेशानुसार १८ एकर शासकीय जमिनीवर खाजगी व्यक्तीची नोंद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

 पुण्यातील हडपसर येथील महाराष्ट्र शासनाच्या नावावर असलेली वन विभाग्ची तब्बल 18 एकर जागा महसूल मंत्र्यांच्या बनावट आदेशानुसार थेट खाजगी व्यक्तीच्या नावा करण्यात आली. याबाबत पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांना ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आले. त्यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. हवेली तहसिलदार तृप्ती कोलते यांनी तातडीने नोंद रद्द करून ही 18 एकर जमीन पुन्हा शासनाच्या नावे केली. खोटी कागदपत्रे दाखल करणा-या विरोधी तहसिलदारांनी केली फौजदारी गुन्हे दाखल केला आहे.
        हवेली तालुक्यातील गुंठ्याला कोट्यावधी रुपये भाव आहे.  हडपसर येथील स.नं. ६२ मधील तब्बल 7 हेक्टर 68 आर म्हणजे 18 एकर जमीन पोपट पांडुरंग शितकल यांनी चक्क तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच नावाने खोटा आदेश करून हेवील तहसिलदारांना सादर केला. परंतु या आदेशावर केवळ मंत्रीच नाही मंत्रालयातील कक्ष अधिकारी याची सही, खरी नकल असे सर्व कागदपत्र खोटी सादर केली. यामुळे संबंधित कागदपत्रांच्या आधारे नोंद घालण्याचे आदेश देण्यात आले. यामध्ये तलाठी व सर्कल यांनी  वन विभागाचे राहुल पाटील यांनी ही 18 एकर जमीन राखीव वन असूर, महसूल मंत्र्यांनी खरोखरच असे आदेश दिले का तपासणी करण्याची मागणी केली. त्यानुसार कोलते यांनी थेट मंत्रालयात जाऊन चौकशी केली असता महसूल मंत्री यांनी संबंधित व्यक्तीचा अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे स्पष्ट आदेश दिल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्वरीत संबंधित व्यक्तीची नोंद रद्द करून पुन्हा एखदा शासनाचे नावे जमीन करण्यात आली. याच वेळी खबरदारी घेत दुय्यम निबंधक यांना अशा सातबा यांची खरेदी - विक्रीचे व्यवहार करू नये असे स्पष्ट आदेश दिले.
To Top