सोमेश्वर रिपोर्टर टीम------
परिंचे : प्रतिनिधी
परिंचे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतीच्या महिला व बालकल्याण निधीतून गावातील गावठाण, घारमळकरवाडी, राऊतवाडी येथील अंगणवाड्यांना प्रत्येकी ५ खुर्च्या व समाज सुधारकांचे ७ फोटो फ्रेम देण्यात आले.
परींचे येथील अंगणवाडी केंद्रांची भौतिक सुविधा बाबतची मागणी लक्षात घेवून सरपंच ऋतुजा जाधव यांनी ग्रामपंचायत महिला व बालकल्याण निधीच्या माध्यमातून गावातील ३ अंगणवाड्यांना प्रत्येकी ५ खुर्च्या व समाज सुधारकांचे ७ फोटो फ्रेम देण्यात आले. शासनाच्या माध्यमातून लहान बालकांना व गरोदर मातांना पोषण आहार देण्यात येत आहे. गावात कुपोषण मुक्त बालक यावर विशेष लक्ष केंद्रीत केले असून अंगणवाडी केंद्र आयएसओ मानांकित करणार असल्याचे सांगितले.
यावेळी सरपंच ऋतुजा जाधव, उपसरपंच दत्तात्रय राऊत, माजी सरपंच समीर जाधव, ग्रामपंचायत सदस्य शैला जाधव, अर्चना राऊत, वंदना राऊत, पुष्पलता नाईकनवरे, गणेश पारखी, संभाजी नवले, ग्रामसेवक शशांक सावंत, अंगणवाडी सेविका हेमा अरणकल्ले, ज्योती गुरव, सविता शेडगे, संजय जाधव, नीता जाधव, सुरेखा राऊत, माया गुरव, बाळू राऊत,बाळू नवले, यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.