दुमजली घरकुल बांधणारी करंजेपुल ग्रामपंचायत ठरली जिल्ह्यात एकमेव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती तालुक्यातील करंजेपुल ग्रामपंचायतने आवास योजनेतुन जिल्ह्यात दुमजली घरकुलचा पाहिलाच प्रयोग राबवून तो यशस्वी केला. दुमजली घरकुल बांधणारी करंजेपुल ग्रामपंचायत ही जिल्ह्यात एकमेव ठरली आहे. याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सरपंच वैभव गायकवाड व ग्रामसेवक आबा यादव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
         दि ३ रोजी पुणे जिल्हा परिषद येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.  
           करंजेपुल या ठिकाणी संभाजी गायकवाड या लाभार्थ्याला दुमजली घरकुल बांधून देण्यात आले आहे. गेल्या चार वर्षात करंजेपुल ग्रामपंचायत ने २५ च्या वर घरकुले बांधली आहेत. यातील दुमजली घरकुलचा पहिला प्रयोग करणारी करंजेपुल ग्रामपंचायत ही एकमेव ठरली आहे.
To Top