सोमेश्वर रिपोर्टर टीम------
श्रावण महिन्याचे औचित्य साधून सोमेश्वरनगर परीसरातील युवकांनी एकत्र येत श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदीर परीसरात वृक्षारोपण केले. यामध्ये विविध देशी प्रकारच्या सुमारे ५० झाडांची लागवड करण्यात आली. एका आगळ्या उपक्रमाचे सोमेश्वर देवस्थानने आणि ग्रामस्थांनी कौतुक करत या युवकांना शाबासकीची थाप दिली. या वृक्षामध्ये सुपारी,चिंच, बेल,जांभूळ, वड, पिंपळ, मोरपंखी आदी झाडांचा समावेश होता. वृक्षारोपणासाठी उत्तम शेंडकर, किरण पवार, पंडित हाके, योगेश शिंदे, दत्तात्रय शिंदे, सचिन गायकवाड, आबा मोठे, नंदकुमार पवार,रामभाऊ गोळे, अमित पाचपुते,बापूराव भंडलकर,अक्षय कचरे, अनिकेत सोनवणे यांचे सहकार्य लाभले.