सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कल्याणी जगताप
शेवटच्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने अक्षरज्ञान प्रतिष्ठान मुर्टी (ता.बारामती) यांच्या वतीने सकाळी उपासाच्या निमित्ताने केळी वाटप करण्यात आले, तसेच संध्याकाळी वाजता महादेवाची आरती घेऊन महाप्रसाद देण्यात आला.
तसेच मंदिराला आकर्षक रोषणाई, मंडप, तसेच हार फुलांची सजावट करण्यात आली होती. ग्रामपंचायत सदस्य आसिफ शेख, नाना सदाशिव खोमणे, शंकर जाधव, कपिल खोमणे, मयुर लोंढे, ऋतिक जावळे, ऋषिकेश ननावटे, नयन खोमणे, शुभम खोमणे, गौरव खोमणे, कृष्णा पाटोळे, तुकाराम खोमणे, संतोष खोमणे, आण्णा खोमणे, गणेश खोमणे यांनी नियोजन केले.