उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कालच्या सभेतील वक्तव्याने मतदारांच्यात भीतीचे वातावरण : संबंधितांवर कारवाई व्हावी - दिलीप खैरे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल सोमेश्वरनगर येथे सोमेश्वर कारखाना निवडणूक संदर्भातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली यामध्ये पवार यांनी केलेल्या विधानामुळे मतदारांमध्ये भीतीचे वातावरण असून लोकशाही मध्ये वैधानिक पदावरील व्यक्ती कडून अश्या प्रकारचे वक्तव्य करणे दुर्दैवी घटना असून तो कायद्याचा ही भंग असून या बाबत आपण संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सोमेश्वर परिवर्तन पॅनेलचे प्रमुख दिलीप खैरे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी यांचेकडे केली आहे. 
            दिलीप खैरे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी दादासो कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना मर्यादित सोमेश्वर नगर ची निवडणूक प्रक्रिया सुरू असून दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी एका जाहीर कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या निवडणुकीत होणारे मतदान कोणत्या केंद्रावर कुणाला मतदान होणार असून ते मला कळणार असून जिथे विरोधात मतदान होणार आहे त्याचं मी पाहतो अश्या स्वरूपाचे विधान केले असून त्यामुळं मतदारांमध्ये भीतीचे वातावरण असून लोकशाही मध्ये वैधानिक पदावरील व्यक्ती कडून अश्या प्रकारचे वक्तव्य करणे दुर्दैवी घटना असून तो कायद्याचा ही भंग असून या बाबत आपण संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी व निवडणूक मतदान व मतमोजणी गुप्त निर्भय वातावरणात पार पडणार असल्या बाबत मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी मतदान केंद्रावर व मद्यामामधून जाहीर पणे या बाबत आपल्या कार्यालयाकडून खुलासा होणे आवश्यक वाटते तरी सदर अर्जाचा तातडीने व गंभीर दखल घेऊन कार्यवाही व्हावी आणि निवडणूक प्रक्रिया भयमुक्त व्ह्यावि अशी मागणी खैरे यांनी केली आहे
To Top