सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
विशेष प्रतिनिधी
हॅलो ......उद्या मुलाखती आहेत.यायचं बर का ? ....आपल्याला जायचं आपल्याला उमेदवारी मिळाली पाहीजे....! इच्छुकांनी आपल्या कार्यकर्त्याना निरोप द्यायला सुरुवात केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दर शनिवारी बारामतीत असतात. उद्या राष्ट्रवादी भवन बारामती येथे सोमेश्वर कारखाना निवडणूक निमित्ताने इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. कारखाना निवडणूकी साठी पाच गट आहेत. त्या पाच गट निहाय मूलखती होणार आहे. मुलाखती पार पडल्याकी लगेच मेळावा सुद्धा पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकत्याची जमवा जमाव करण्यास सुरवात केली आहे. एकाच गावात कारखान्याचा पॅनेल होईल इतक्याचे उमेदवारी अर्ज दाखल आहेत. आमच्या पैकी कोणात्याही एका उमेदवाराला उमेदवारी द्या असा सूर सगळीकडे सभासद भेटी दौऱ्यात बोलून दाखविले जात होते.
काही दिवसांपूर्वी सोमेश्वर येथे वाघळवाडी येथील सोमेश्वर पॅलेस ठिकाणी पार पडलेल्या मेळाव्यात नंतर सभासद दौरा सुरू झाला पण मूलाखती होणार की नाही ? या संभ्रमात उमेदवार होते. पण आज सोशल मीडिया वर उद्या मुलाखती होणार याचे निरोप आल्याने उमेदवार तयारी लागले आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मूलाखती पार पडल्यावर अजित पवार मेळाव्यात काय बोलतात? काय कानमंत्र सांगतात हे उद्याच समजणार आहे. एकंदरीत पाच वर्ष अभ्यास करणारे पास होणार की ऐनवेळी अभ्यास करणारे पास होणार? याचा दोन दिवसात रिझल्ट दिसेल.