सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आज निवडणूक प्रकिया पार पडत आले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलच्या मताधिक्याला नाराजीचे ग्रहण लागल्याचे कार्यक्षेत्रात चित्र आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत २० जागेंसाठी ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील १५२ गावातील ८३ मतदान केंद्रावर २५ हजार ५३४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेल आणि भाजप पुरुस्कृत सोमेश्वर परिवर्तन पॅनेल या निवडणुकीत आमने सामने उभे आहेत. तत्पूर्वी सोमेश्वर विकास पॅनेलचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. आज होत असलेल्या मतदानात २० जागांसाठी तब्बल ४६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होत आहे.
दरम्यान सोमेश्वर रिपोर्टर टिमने केलेल्या सर्वेक्षणात एक धक्कादायक बाब पुढे आली असून कार्यक्षेत्रातील बहुतांश भूत केंद्रावर क्रॉस वोटिंग सुरू असून कोणी भावकी, कोणी पाहुने, कोणी मित्र तर कोणी समाज धरला यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस चा मतदानाचा टक्का घसरण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॅनेल टू पॅनेल मतदान करा असे आवाहन करून देखील अनेक नाराजांनी क्रॉस वोटिंग चे हत्यार उपसले आहे.