दिवाळीपूर्वी प्रतिटन ९२ रुपये व ठेवीवरील व्याज वर्ग करणार : राजेंद्र यादव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना दिवाळीपूर्वी टनाला ९२ रुपये तसेच ठेवींवरील व्याज खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली. 
             सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ५९ व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभावेळी  यादव बोलत होते.  राजेंद्र यादव व त्यांच्या सुविद्य पत्नी  मनिषा यादव व चिफ अकौंटट  योगीराज नांदखिले व त्यांच्या सुविद्य पत्नी सुचिता नांदखिले या उभयतांच्या हस्ते व कारखान्याचे अधिकारी व कामगार यांच्या उपस्थितीत बॉयलर पुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संचालक किशोर भोसले, विशाल गायकवाड, लालासाहेब नलवडे, कामगार संचालक बाळासाहेब काकडे, राहुल वायाळ, कागमर कल्याण अधिकारी दत्ता माळशिकारे, कामगार अधिकारी दीपक निंबाळकर,शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक देविदास निकम कामगार उपस्थित होते. यादव पूढे म्हणाले, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु करण्यासाठी कारखान्यातील सर्व अंतर्गत कामे पूर्ण झाली असुन सोबतच आपल्या कारखान्याचे सुरु असणारे विस्तारीकरणाचे कामही प्रगतीपथावर असुन आपण आपला कारखाना सुरु करण्यासाठी सज्ज झाला आहे. १५ जानेवारीपर्यंत कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. कारखान्याकडे सद्या ३७ हजार ५०० एकरातील एकरी ४० च्या सरासरीनुसार १३ लाख ८० हजार मे टनाच्या आसपास ऊस उपलब्द असून बिगर नोंदीचा २ लाख टनाच्या आसपास ऊस उपलब्ध आहे. अतिरिक्त ऊस संपवण्यासाठी कारखाना प्रशासनाने दौंड शुगर, माळेगाव, छत्रपती, शरयू ऍग्रो, श्रीदत्त शुगर, बारामती ऍग्रो या करखान्यांशी पत्रव्यवहार केला आहे. असे सांगून कारखान्याने गत हंगामाची संपुर्ण एफ.आर.पी. सभासदांना अदा केली असुन येणा-या हंगामात सभासदांच्या नोंदलेल्या संपुर्ण उसाचे वेळेत व्हावे यासाठी आतील संपुर्ण कामे पुर्ण करीत आपले सुरु असलेले विस्तारवाढीचे काम माहे जानेवारीअखेर पुर्ण करायचा मानस असुन जानेवारीपासुन प्रतिदीन ७५०० मे. टनाने गाळप कारखाना करेल असा विश्वास असल्याचे यादव यांनी सांगितले.  
        कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक निंबाळकर यांनी केले तर आभार संचालक विशाल गायकवाड यांनी मानले.
To Top