........अखेर वाघळवाडीचा बहिष्कार मागे ! आम्ही अजितदादा सोबतच

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- --
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 

आम्ही अजितदादांच्या सोबत.... याचा नारा देत ग्रामस्थांनी  गेली चार दिवस विविध फलकाच्या च्या माध्यमातून चर्चिला जाणाऱ्या बहिष्काराच्या  विषयावर वाघळवाडी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत  लावण्यात आलेले फलक उतरवून बहिष्कार मागे घेत पूर्णपणे वरील विषयास पूर्णविराम दिला आहे. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा विषय पुढे आला होता.
      राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विकासाला गती देणारे नेतृत्व आहे.वाघळवाडी गावाच्या विकासासाठी भरघोस निधी देऊन गावाच्या विकासात मोठा बदल झाला आहे.सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे वाटचाल करत आहे. त्यामुळे अजितदादा यांच्या पाठीमागे वाघळवाडीतील सर्व ग्रामस्थ खंबीरपणे कायम सोबत आहेत. असे गावातील ग्रामस्थांच्या पार पडलेल्या बैठकीत एकमुखाने सांगितले.
   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे  उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना उमेदवारी मिळाली नव्हती तर गावातील युवकांना नोकर भरतीत प्राधान्य द्यावे या विषयावर  निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या विषय झाला होता.त्याचे फलक लावण्यात आले होते.ते फलक उतरवत गावातील ग्रामस्थांनी एकत्र  येत  बहिष्कार या विषयामुळे सोमेश्वर कारखान्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या फलकाच्या माध्यमातून चर्चिला जाणा-या विषयास पूर्णविराम मिळाला आहे. 
             उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत  पूर्णपणे राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे काम मागेही करत होतो आणि पुढेही करत रहाणार असल्याचे ग्रामस्थांनी एकमताने सांगितले.
___________________
वाघळवाडीकरांना आश्वासन---- -----
काल युवकांच्या सोबत झालेल्या बैठकी मधील चर्चे दरम्यान युवकांनी सोमेश्वर कारखान्यामध्ये नोकर भरती मध्ये प्राधान्य द्यावे अशी भूमिका मांडली.यावेळी   सोमेश्वर सहकारी कारखान्यात नोकरी साठी प्राधान्य देण्यात येईल याबाबत अजितदादा पवार यांना हा विषय सांगण्यात येईल. असे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर,माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक मदनराव देवकाते असे आश्वासन दिले.
To Top