खंडाळा ! लोणंद येथील पत्रकार हल्ला प्रकरणातील आरोपीची जाहीर माफी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद प्रतिनिधी 

लोणंद येथील सातारा जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सचिव पत्रकार प्रशांत ढावरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातील आरोपी संदिप जयवंत खरात याने झाल्या प्रकाराबद्दल बिनशर्त माफी मागत दिलगीरी व्यक्त करत प्रकरण थांबवण्याची विनंती केली. त्यास सहकारी पत्रकार शशिकांत जाधव,  रमेश धायगुडे, मंगेश माने व पोलीस बांधव तसेच सातारा जिल्हा डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन भिलारे यांच्याशी चर्चा करून ह्या विषयी पुन्हा अशी चूक होऊ न देण्याच्या अटीवर प्रकरण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला . 

सदर घटने नंतर जिल्ह्य़ातील व जिल्ह्य़ाबाहेरील अनेक पत्रकार संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात येऊन पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी करण्यात येत होती. त्या सर्व पत्रकार संघटनांचे व पत्रकार बांधवांचे पाठिंबा जाहीर केल्याबद्दल पत्रकार प्रशांत ढावरे यांनी धन्यवाद व्यक्त केले.
To Top