पुरंदर : प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषदे संचलीत पुणे जिल्हा सोशल मिडियाच्या उपाध्यक्षपदी पुरंदर तालुका मराठी पत्रकर संघाचे माजी अध्यक्ष राहुल शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज पुणे येथे परिषदचे मुख्य विश्वस्थ एस. एम. देशमुख व सोशलशल मिडियाचे राज्य निमंत्रक बाप्पुसाहेब गोरे यांनी शिंदे यांची नियुक्ती केली.
मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन डिसेंबरमध्ये होत आहे. या अधिवेशनाची तयारी करण्याबाबत नियोजनाची बैठक कोंडवा (पुणे) येथील प्रतिभाताई पवार महाविद्यालयात झाली. प्रमुख विश्वस्थ एस. एम. देशमुख यांनी पुणे जिल्हा सोशल मिडियाच्या उपाध्यक्षपदी पुरंदर तालुका मराठी पत्रकर संघाचे माजी अध्यक्ष राहुल शिंदे यांची नियुक्ती केली. यावेळी सोशल मिडिया निमंत्रक बाप्पुसाहेब गोरे, शरद पाबळे, सुनील लोणकर, सुनील जगताप, सोशल मिडियाचे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे व्यासपीठावर उपस्थित होते. तर जिल्हाभरातील तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सोशल मिडियाचे अध्यक्ष व कर्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदे यांच्या नियुक्तीनंतर पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व हल्ला विरोधी क्रुती समितीचे बी. एम. काळे, माजी अध्यक्ष दत्तानान भोंगळे, प्रा डॉ. दिगंबर दुर्गाडे, भैय्यासाहेब खाटपे, दादासाहेब गायकवाड, सुनील पाटोळे यांनी अभिनंदन केले.
नियुक्तीनंतर बोलताना राहुल शिंदे म्हणाले की, सध्या सोशल मीडियाचे महत्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याच बरोबर या माध्यमातून पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांच्या समस्याही वाढल्या आहेत. जिल्ह्यातही सोशल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांचे संघटन करून एक मजबूत संघटन करण्यासाठी परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख, सोशल मीडिया निमंत्रक बापूसाहेब गोरे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर व सोशल मीडिया परिषदेचे अध्यक्ष जनार्दन दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. तर पत्रकाराच्या कल्याणासाठी आपण प्राधान्याने काम करणार असल्याचे ते म्हणाले.