सोमेश्वर रिपोर्टर टीम------
गेल्या एक महिन्यापासून सुपे परिसरात कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने ट्रान्सफर व विद्युत मोटारा जळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विजेअभावी शेतकऱ्यांची पीके जळून चालली आहेत. येत्या दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत न केल्या लक्ष्मीपूजन दिवशी सुपेच्या महावितरण कार्यालयापुढे बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा सोमेश्वर कारखान्याचे संचालक गणेश चांदगुडे यांनी दिला आहे.
याबाबत चांदगुडे यांनी सुपे येथील महावितरण कार्यालयाला निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हणटले आहे. कमी दाबाच्या विजेमुळे ट्रान्सफर जळणे, विद्युत मोटारा पाच पाच मिनिटाला बंद पडणे परिणामी त्या जळणे याचा बुर्दंड शेतकऱ्यांना पडत आहे तर दुसरीकडे पाण्याअभावी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. येत्या दोन दिवसात पुरवठा सुरळीत न केल्या आंदोलन केले जाईल असे निवेदनात म्हटले आहे.