सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
शिक्षणामुळे माणसाच्या जीवनात प्रगतीची दारे खुली होतात.विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून आपल्या जीवनाचा कायापालट करण्यासाठी अभ्यासू वृत्ती अंगीकारली पाहिजे.भविष्यात जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे असे प्रतिपादन उत्तर प्रदेश राज्यातील जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय समन्वयक डॉ. सागर घोडेकर यांनी केले.
भोर शहरातील संकल्प प्रतिष्ठान अभ्यासिका मध्ये रमेश लक्ष्मण घोडेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त २५ स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन पुस्तकांचे वाटप केले यावेळी ते बोलत होते.स्मृतिदिनानिमित्त सामाजिक उत्तरदायित्व जपण्यासाठी पुस्तके देण्यात आली.या पुस्तकांमुळे गरीब व होतकरू विध्यार्थ्यांना अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता येणार आहे.यावेळी संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुदाम ओंबळे,सामाजिक कार्यकर्ते समीर घोडेकर, दत्तात्रय तनपुरे,भीमराव शिंदे,विठ्ठल दानवले, सिंधुताई घोडेकर, रेश्मा घोडेकर, निवृत्त उपसंचालक कोश आधिकारी मनोहर वाडेकर उपस्थित होते.
COMMENTS