सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील चोपडज येथील चोपडज वाकी रस्त्यावर एक महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे.
सुरेखा ज्ञानदेव गाडेकर असे त्या महिलेचे नाव आहे. आज दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी ही घटना चोपडज येथे घडली. याबाबत सविस्तर सदरील महिला आपल्या घराबाहेर वाकी चोपडज रस्त्यावर उभी असताना दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांमधील दोघांनी सदरील महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावून आरोपी पसार झाले आहेत.
दरम्यान पोलिसांचा शोध सुरू असून लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतील असे सपोनि सोमनाथ लांडे यांनी सांगितले.