या वर्षी दिवाळी सणा निमित्त (Diwali 2021) नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांत आहे. या महिन्यात भरपूर बँक हॉलिडे (Bank Holiday) असणार आहेत. साप्ताहिक सुट्ट्यांसह (Bank Holidays in November 2021) एकूण सतरा दिवस बँका नोव्हेंबर महिन्यात बंद (Bank Holiday List) राहणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, छठपूजा, गुरुनानक जयंती असे महत्त्वाचे दिवस आहेत. यादिवशी बऱ्याच राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे.सुट्टीच्या दिवशी बँकेत गेलात, तर बँकांना कुलूप असेल त्यामुळे यापूर्वी कोणत्या दिवशी बँकांना सुट्ट्या आहेत हे जाणून घ्या. या बँक हॉलिडेमुळे तुमच्या बँकेशी संबंधित कामे होणार नाहीत. अर्थात प्रत्येक राज्याप्रमाणे बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. बँक हॉलिडे प्रत्येक राज्यामध्ये (upcoming bank holidays list) वेगवेगळे असतात, कारण काही सण-समारंभ असे असतात की, जे ठराविक राज्यांत साजरे केले जातात. ज्या राज्यामध्ये सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत त्याठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे त्याप्रमाणे योजना आखून तुम्ही बँकेत जा. नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित काही कामं असतील, तर ती लवकरच पूर्ण करा. नोव्हेंबर २०२१ मध्ये धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, छठपूजा, गुरुनानक जयंती यांसारख्या सुट्ट्या आहेत. अशावेळी एकूण सतरा दिवस बँका बंद राहणार आहेत, परंतु यामध्ये भारतभरातील सुट्ट्यांचा समावेश आहे.
या दिवशी बँका राहणार बंद
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) नोव्हेंबर महिन्याकरिता अधिकृत बँक सुट्ट्यांची यादी लागू केली आहे, त्याप्रमाणे नोव्हेंबर महिन्यात १७ सुट्ट्या आहेत. यादरम्यान भारतामधील बर्याच शहरांमध्ये बँका सातत्याने बंद राहतील. या १७ दिवसांच्या सुट्टीमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे, रविवारी तसेच महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत (Under Negotiable Instruments Act), RBI ने १, ३, ४, ५, ६, १०, ११, १२, १९, २२ व २३ नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय महिन्यामध्ये ४ रविवार व दुसरा व चौथा शनिवार सुट्ट्या आहेत.
सुट्ट्यांची यादी?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी (Bank Holiday List) लागू केली जाते. प्रत्येक महिन्याची यादी याठिकाणी पाहता येईल. आरबीआयच्या वेबसाइटवर ऑक्टोबर महिन्यामधील सुट्ट्यांची (Bank Holidays List October 2021) यादी तुम्हाला तपासता येईल. या २१ दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे. यादरम्यान काही ठिकाणी तर सलग ५ ही दिवस बँका बंद आहेत.
या राज्यांमध्ये बँका बंद
दिवाळी पूजेच्या निमित्ताने ४ नोव्हेंबरला बंगळुरू वगळता सगळ्या राज्यांमध्ये बँका बंद राहतील. अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, गंगटोक, लखनऊ, डेहराडून, जयपूर, कानपूर, मुंबई व नागपूरमध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ नोव्हेंबर रोजी गोवर्धन पूजा/बलिप्रतिपदेच्या दिवशी बँका बंद राहतील. गंगटोक, इम्फाळ, कानपूर, लखनऊ व शिमला येथील बँका ६ नोव्हेंबर रोजी भाऊबीज, चित्रगुप्त जयंती, निंगोल चाकोबा असल्यामुळे बंद राहतील. पाटणा व रांचीमध्ये १० नोव्हेंबरला छठपूजेनिमित्त बँका बंद राहणार आहेत. ११ नोव्हेंबरला छठपूजेच्या निमित्ताने पाटण्यात बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. शिलाँगमधील सर्व बँका १२ नोव्हेंबर रोजी वंगला उत्सवानिमित्त बंद राहतील. १९ नोव्हेंबरला गुरुनानक जयंती व कार्तिक पौर्णिमेला बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील. कनकदास जयंतीच्या दिवशी २२ नोव्हेंबरला बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील. २३ नोव्हेंबरला सेंग कुत्स्नामच्या निमित्ताने शिलाँगमधील बँका बंद राहतील.
COMMENTS