सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
येथील अक्षय शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून तिरुपती बालाजी उद्योगात कार्यरत असलेल्या ४०० महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त किराणा मालाचे किट देण्यात आले. यासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च आला आहे. तर दोनशे कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात मदत करण्यात आली.
निंबुत (ता. बारामती) येथे तिरुपती बालाजी मशरूमनिर्मिती करणाऱ्या शेतीपूरक उद्योगात सहाशे स्त्री-पुरुष कायम व रोजंदारी पद्धतीने काम करतात. स्थानिक चारशे जणांना अक्षय शिंदे फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने सलग सातव्या वर्षी दिवाळीनिमित्त मदत करण्यात आली. यावेळी तेल, डाळी व दिवाळीसाठीचे साहित्य देण्यात आले. याप्रसंगी अक्षय शिंदे फाउंडेशनचे आर. एन. शिंदे, आशालता शिंदे, तिरुपती बालाजीचे मुख्य व्यवस्थापक संजय शिंदे, योगेश सोळंस्कर, संतोष शेंडकर, रणजित चव्हाण उपस्थित होते.
दरम्यान, अक्षय शिंदे फाउंडेशनने सायकल व शैक्षणिक साहित्य वाटप, बारा विद्यालयात पहिले येणाऱ्या मुलामुलींना आर्थिक मदत, दुष्काळी गावांना पाणीवाटप, जिल्ह्यातील अंगणवाड्याना गॅस कनेक्शन वाटप, शाळांना बसस्थानक, काकडे महाविद्यालयास सांस्कृतिक सभागृह, तीन अंगणवाड्या अशी कामे केली आहेत. यासोबतच गरजूंना दिवाळीचा किराणा देण्याची परंपरा सात वर्षे राखली आहे.
COMMENTS