सोमेश्वर रिपोर्टर टिम
परभणी
मागील महिण्यात अतिवृष्टी पाऊस झाल्याने
पिकांची पुर्णतः वाताहत झाली. एकाच महिण्यात सात वेळा
अतिवृष्टी पाऊस झाल्याने यामध्ये बहुतांश ठिकाणी पिकांसह
जमीनीतील माती देखील वाहून गेली होती. यामुळे
शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले होते. दरम्यान या
अतिवृष्टीची मदत होऊन अद्यापही शेतकऱ्यांच्या हातात
पडली नाही. दरम्यान मागील पंधरा दिवसांपूर्वी परतीचा
पाऊस राज्यातून गेला असताना पुन्हा चक्रीवादळ तयार
होऊन दिवाळीच्या धामधुमीत पाऊस पडेल असा अंदाज
हवामान अभ्यासक पंजाब डख (Panjab Dakha) यांनी
दिला आहे. दि.2, 3 व 4 नोव्हेंबरला ऐन दिपावळीमध्येच
राज्यात पावसाची शक्यता डख यांनी वर्तविली असून
शेतकऱ्यांनी सतर्क रहावे असे आवाहन देखील करण्यात
आले आहे.
पुढे पंजाबराव डख त्यांनी म्हटले आहे की, श्रीलंकेपासून
250 किमी अंतरावर एक चक्रीवादळ तयार होत आहे. त्याचे
रूपांतर वादळात होउन सहा राज्यात पडणार पाऊस पडेल.
यामध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलांगणा, कर्नाटक, केरळ,
तामीळनाडू समावेश असून या राज्यात 2, 3 व 4 नोव्हेंबर
दिपावळीमध्ये पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी
आपल्या सोयाबिन, मका, कांदा रोप, कापूस, द्राक्ष, पिकांची
काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. तर अचानक
वातावरणात बदल झाला तर पुन्हा मेसेज दिला जाईल, असे
देखील डख यांनी सांगितले आहे. शेवटी अंदाज आहे, वारे
बदल झाला की वेळ, ठिकाण, बदलते माहीत असावे, असे
पंजाब डख यांनी सांगितले आहे.