भिगवण ! वेश्याव्यवसाय चालणाऱ्या हॉटेलवर धाड टाकत एकास अटक तर दोन २ तरुणींची सुटका

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भिगवण : प्रतिनिधी
 दोन तरुणींकडून आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या हॉटेलवर भिगवण पोलीसांनी धाड टाकून यात एकाला अटक केली तर दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

हि घटना दि २६  रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मदनवाडी (ता. इंदापुर जि पुणे) गावचे हद्दीत असणाऱ्या आनंद हॉटेल व लॉजमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गंगाजी नारायणराव आवरगंड (वय 32 वर्ष, व्यवसाय. हॉटेल / लॉजींग, रा. भिगवण, . ता. इंदापुर, जि. पुणे, मुळ रा. रूमणा जवळा ता. गंगाखेड, जि.परभणी) यास अटक केली आहे. याबाबत रूपेश विजयसिंह कदम, (पोलीस उपनिरीक्षक, नेमणुक भिगवण पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे.
To Top