सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर-प्रतिनिधी
तरुणांनी भविष्यातील करिअरसाठी वैयक्तीक खेळांकडे ओढ निर्माण करून प्राविण्य मिळविणे गरजेचे आहे.वैयक्तिक खेळांमुळे तरुणांचे भविष्य घडेल असे मत सामाजिक कार्यकर्ते अनिल सावले यांनी खानापूर ता.भोर येथील क्रिकेट स्पर्धांच्या बक्षीस वितरण प्रसंगी केले.
खानापूर येथील काळभैरवनाथ तरुण मंडळाने आयोजलेल्या क्रिकेट स्पर्धांमध्ये २४ संघांनी भाग घेतला होता.यात प्रथम कर्णावड,द्वितीय बाजारवाडी, तृतीय खानापूर संघ विजयी झाला असून प्रथमेश शिर्के हा मान ऑफ द टूरनामेंट ठरला.बक्षीस वितरण प्रसंगी राजगड संचालक उत्तम थोपटे,सरपंच अमर बुडगुडे,दत्तात्रय गरुड,सुनील थोपटे,धनंजय धुधाने उपस्थित होते.