सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा दरवर्षी दिवाळीनिमित्त सभासदांना सवलतीच्या दरात साखरेचे वाटप करत असतो मात्र यावर्षी सभासदांना दिली जाणारी साखर ही कमी दर्जाची असल्याचा आरोप पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा सभापती दिलीप खैरे यांनी केला आहे.
दिलीप खैरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, आपल्या कारखान्याने दिवाळी निमित्त ऊस उत्पादक सभासदांना सवलतीच्या दरात 30 किलो साखर देणार असे घोषित केले असून त्याप्रमाणे वितरण सुरू असून वितरित करण्यात येत असलेली साखर कमी दर्जाची पावडर स्वरूपात असल्याचं आढळून येत आहे वास्तविक दीपावली सारखा सण साजरा करताना या आनंदाचे क्षणी सभासदांना वर्षातून एकदाच होत असलेल्या विशेष साखर वाटप प्रसंगी किमान चांगली एम 30 या दर्जाची दाणेदार साखर वितरित व्हावी व सुरू असलेल्या वितरण व्यवस्थेत तातडीने सुधारणा व्हावी असे अर्जात म्हणटले आहे.