सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी (ता. बारामती) येथील निकिता शिवाजी लेंबे हिने 'महाराष्ट्र स्टेट ट्रॅडिशनल रेसलिंग अँड पॅनक्रेशन चँपियनशीप-२०२१' या दहाव्या राज्यस्तरीय स्पर्धेत कुस्ती प्रकारामध्ये सुवर्णपदक तर किक-बॉक्सिंग प्रकारात रजतपदक मिळवले याबद्दल अक्षय शिंदे फाउंडेशनच्या वतीने निकीताच्या पुढील शिक्षणासाठी १५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
निकिता लेंबे ही सद्या बीएस्सी च्या पहिल्या वर्षाला महाड येथील ऍग्रीकल्चर महाविद्यालयात शिकत आहे. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. याबद्दल अक्षय शिंदे फाउंडेशनच्या वतीने तिला पुढील शिक्षणासाठी १५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी फाउंडेशन चे अध्यक्ष आर एन शिंदे, संजय शिंदे व शिवाजी लेंबे हे उपस्थित होते.