सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
जुबिलंट इंग्रेव्हिया तर्फे आयोजित कम्युनिटी मीटला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.कंपनीच्या आवारात आयोजित या कार्यक्रमात तहसीलदार रुपाली सरनोबत,जेजुरीचे पोलीस इनचार्ज सुनील महाडिक,वडगाव पोलीस स्टेशनचे इनचार्ज सोमनाथ लांडे,नीराचे सरपंच तेजस्वी काकडे,उपसरपंच राजेश काकडे,निंबुतच्या सरपंच निर्मला काळे,उपसरपंच अमरभैय्या काकडे,आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, पत्रकार बंधू आणि भगिनी यांसह १२० नागरिक सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली.सुरूवातीला जुबिलंट इंग्रेव्हियाचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांनी जुबिलंट समूहाबाबत माहिती दिली.त्यानंतर सीएसआर प्रमुख अजय ढगे यांनी सीएसआर उपक्रमांची दिली. ज्या आरोग्यसेवकांनी करोना काळात अविरत काम केले अशा व्यक्ती,कोरोना योध्दे,पोलिस कर्मचारी व पत्रकार यांचा सन्मान तहसीलदार आणि सरपंचांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रूपाली सरनोबत यांनी आपले मनोगत व्यक्त केले,तर कंपनीचे मनुष्यबळ अधिकारी दीपक सोनटक्के यांनी कंपनीच्या मनुष्यबळ विभागाच्या कामकाजाबाबत माहिती दिली आणि निशांत फड यांनी सुरक्षा आणि पर्यावरणाबाबत घेण्यात येणारी काळजी याविषयी मार्गदर्शन केले.कंपनीच्या उत्पादनांची माहिती सुब्रमण्यम भट यांनी दिली.
याप्रसंगी सुरक्षा विषयक प्रात्यक्षिके सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रश्नोत्तर सत्र पार पडले. यामध्ये कंपनीचे नीरा युनिट हेड सतीश भट यांनी प्रश्नांची उत्तरे दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हंसप्रभा यांनी केले तर अंकिता यांनी आभार प्रदर्शन केले.