भोर : ट्रॅव्हल्समध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा राजगड पोलिसांनी केला पर्दाफाश : दोन आरोपींना केले गजाआड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
हुबळी ते मुंबई ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणाऱ्या फिर्यादी कमलेश सकूनराम राठोड रा.मुंबई यांचे ९८ तोळे वजनाचे कानातील रिंगा, झुमके,नेकलेस,रानिहार असे वेगवेगळ्या दागिन्यांची पिशवी हडप करणाऱ्या टोळीचा राजगड पोलीसांनी पर्दाफाश केला असून आरोपी मारुती राजाराम पिठेकर रा. माळंगी ता.कर्जत व अनंता लक्ष्मण धांडे रा.वालवड ता.कर्जत यांना अटक केली.
   या कारवाईत ३७,७२,२२२ रुपये किमतीचे ९८२ ग्रॅम व ३५० मिलिग्राम सोने हस्तगत केले आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील,पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पोरे यांनी केली.
To Top