राज्यातील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर

Pune Reporter
सोमेश्वर रिपोर्टर टिम  
मुंबई :
 करोना covid-19 च्या पार्श्वभूमीवर लावण्यातआलेल्या लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा All School पुन्हा सुरु झाल्या आहेत. मुंबई, पुणे,ठाण्यासह राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं ४ ऑक्टोबर पासून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेले होते. आता हे वर्ग पुन्हा दिवाळीच्या सुट्टीनिमित्त  बंद राहतील.

राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध धार्मिक सण आणि उत्सवांकरीता सुट्ट्या विद्यार्थ्यांना शासनाने  जाहीर केल्याआहेत.

सण २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये दिवाळी सणाच्याअनुषंगाने राज्यातील शाळांना दिनांक २८ ऑक्टोबर ते १०नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सुट्ट्या घोषित केल्याआहेत. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारेऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरु असलेले वर्ग बंद राहतील.
To Top