भोर ! एसटी कामगारांचे कामबंद आंदोलन : पुणेसह ग्रामीण भागात लालपरी थांबल्याने सेवा कोलमडली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन न्याय मागण्यांसाठी केलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देत भोर बस स्थानकात कामगारांनी गुरुवार दि-२८ कामबंद बेमुदत उपोषण केले. यामुळे पुणेसह ग्रामीण भागात धावणारी लालपरी थांबूनच राहिल्याने एसटीची सेवा कोलमडली असून प्रवाशांची गैरसोय झाली.

      या कामबंद उपोषणात भोर एसटी आगाराचे २४३ कर्मचारी सहभागी झाले होते. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झाले पाहिजे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ % महागाई पत्ता फरका सहित दिवाळीपूर्वी देण्यात यावा. या व अन्य मागण्यांसाठी हे काम बंद उपोषण करण्यात येत असल्याचे कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन यांनी सांगितले.यावेळी डेपो सचिव रवींद्र कदम,अध्यक्ष रवींद्र धुमाळ,मनोज पाटणे ,सचिन जाधव,विजय मोरे,नितीन शिर्के आदींसह शेकडो कर्मचारी उपस्थित होते.

To Top