सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे ता.२७रोजी सकाळी ११वाजता महिला सभा आयोजित केली गेली. या वेळी महिलांच्या विविध मागण्या व अडचणी यासंबंधी चर्चा झाली. नंतर १२ वाजता ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभा आयोजित केलेली होती. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी हजेरी लावली. गावचे सरपंच, ग्रामसेवक अधिकारी यांनी आयोजित २०२२-२३वर्षी विकास आराखडा सादर केला.तसेच ग्रामस्थांच्या अडचणी प्रश्न -उत्तरे याचा तास सुरु झाला. विविध मागण्या रखडलेली कामे,नियोजित कामे,यांचा पाठपुरावा करणे या बाबत विचार विनिमय सुरू झाला. ग्रामस्थांनी मांडलेल्या अडचणी अपूर्ण विकास कामे 100 दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले. यावेळी मतदार नोंदणी,जैविक विविधता व्यवस्थापन, घरकुल योजना,शौचालय योजना,वसुंधरा अभियान, करवसुली, घनकचराव्यवस्थापन, रोजगार, शेतकरी योजना तसेच नवीन कामे सीसीटीव्ही कॅमेरा गावात लावणे, पाणी,सिमेंटचे रस्ते,वीज या प्रश्नांचा मुद्दा मार्गी लावणे याबाबत अनेक मुद्द्यांवर ग्रामस्थ सदस्य सरपंच ग्रामसेवक अधिकारी यांच्यामध्ये जोरदार चर्चा झाली. यावेळी गावचे सरपंच सुनील ढोले उपसरपंच संगीता शहा गावचे ग्रामसेवक अधिकारी शहानूर शेख व सुनील गायकवाड कृषी अधिकारी, सौ होले मॅडम अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच आजी- माजी ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खारीचा वाटा म्हणून पत्रकार मित्र -अमोल गायकवाड, संतोष भोसले,सुनील जाधव यांनी उपस्थिती दाखवून ग्रामस्थांच्या वतीने लवकरात- लवकर कामे पूर्ण करावी. सरपंच व अधिकारी यांच्याकडे केली