सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
श्री सोमेश्वर कामगार सह. पतसंस्था सोमेश्वरनगर, या संस्थेच्या वतीने नवीन कर्ज मर्यादा वाढवण्यात आली आहे. कायम कामगाराला पाच लाख रुपये व हंगामी कामगाराला तीन लाख पन्नास हजार रुपये असे कर्ज वाटप करण्यात आले आहे, या संस्थेच्या कामकाजामध्ये कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप व्हा. चेअरमन शैलेश रासकर व कार्यकारी संचालक यादव साहेब यांची नेहमी संस्थेच्या कामकाजाबद्दल सहकार्याची भूमिका असते.त्यांचे संस्थेच्यावतीने हार्दिक अभिनंदन.
या कामगार कर्ज वाटपामध्ये आज खालील कामगारांना संस्थेचे चेअरमन, संचालक व कामगार नेते यांच्या हस्ते चेकने कर्ज वाटप करण्यात आले.
संदीप सुदाम सोरटे.
किसन विट्टल जोशी.
जनार्धन निवृत्ती मतकर.
शरद सोपान पानसरे.
यांच्यासाहित इतर कामगारांना कर्ज वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन पंढरीनाथ राऊत, राहुल सोरटे ,श्रीकांत जगताप कामगार संचालक बाळासाहेब काकडे,बाळासाहेब गायकवाड, संतोष भोसले, संस्थचे सचिव सुधाकर पिसाळ,शांताराम सोनवणे व संस्थेचे सभासद उपस्थित होते.
या संस्थेचे क्लार्क महेश भोसले यांनी सर्वांचे आभार मानले
COMMENTS