सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर-प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दुर्गम -डोंगरी भागातील आंबाडे ता.भोर येथील दिव्यांग बांधब प्रवीण खोपडे यास सामाजिक बांधिलकी जपत वेल्हे तालुक्यातील उद्योजक सुनील राजिवडे यांनी व्हीलचेअर भेट दिली. व्हीलचेअरची साथ मिळाली असल्याने प्रवीणच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते. प्रवीणचे कष्ट आणि जिद्द पाहून मदत करावीशी वाटल्याचे राजीवडे म्हणाले. यावेळी आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर घोडेकर, उपाध्यक्ष संतोष शिवतारे ,पुण्यातील युवा उद्योजक राजेश बोडके, अरविंद बोडके व विजय बोडके आदी उपस्थित होते.