वाघळवाडी गावचा काळा बोर्ड लावून निषेध : गावाला उमेदवारीतून पुन्हा वगळले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलची यादी जाहीर झाली यामध्ये वाघळवाडी गावाला पुन्हा डावलण्यात आल्याने नाराज कार्यकत्यांनी काळ्या बोर्ड वर केळाचे चित्र काढून निषेध करण्यात आला.
                 काल रात्री काही वेळच हा फ्लेक्स लावण्यात आला पोलिसांनी मध्यस्थी करत हा बोर्ड उतरवण्यात आला. मात्र काल रात्री पासून सोशल मीडियावर याच फ्लेक्स ची चर्चा सुरू आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने पॅनल जाहीर केला. हा पॅनल जाहीर केल्यानंतर कार्यक्षेत्रात चर्चा नाही, मात्र काही गावांमधून नाराजी उमटली. याचा परिणाम म्हणजे वाघळवाडी परिसरात केळाचे चित्र असलेला फलक प्रसिद्ध करण्यात आला. सोमेश्वर सहकारी काल साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भातील राष्ट्रवादीच्या सोमेश्वर विकास पॅनल ची यादी जाहीर करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये उमेदवारी मिळण्यासाठी गर्दी जास्त होती. 
            कारखाना स्थापनेपासून वाघळवाडी गावाला संचालक पदाची संधी नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वाघळवाडी गावाला संधी मिळावी अशी मागणी केली होती मात्र संधी न मिळाल्याने फ्लेक्स च्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली.

To Top