सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वर नगर ता. बारामती जि. पुणे यांचे संचालक मंडळ निवडणुक २०२१ च्या निवडणुकीसाठी शांताराम शिवाजी कापरे यांना तीन आपत्या असल्या कारणाने त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष संदीप चिकने यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात महटले आहे, मांडकी जवळार्जुन गटातून शांताराम कापरे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले असून गट नं ५ मांडकी जवळार्जुन या गटातून अर्ज दाखल केला आहे. तसेच ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व उपनन संस्था या विभागातून दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सदर उमेदवारास १३ सप्टेंबर २००२ नंतर तिसरे आपत्य असून ते या निवडणूक संस्थेची निवडणूक लढविण्यास अपात्र आहे. त्यांना शुभांगी शांताराम कापरे, तेजस्वी शांताराम कापरे तर भुषण शांताराम कापरे ही तीन आपत्य असून निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार १३ सप्टेंबर २००२ नंतर तिसरे आपत्य असेल तर सदर उमेदवार निवडणूक लढविण्यास अपात्र असतो. त्या नियमाप्रमाणे सदरील उमेदवार हे निवडणुक लढविण्यास अपात्र असतात. असे चिकने यांनी सांगून याबाबत न्यायालायत दावा दाखल करणार आहे. त्याचबरोब शांताराम कापरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सहकारी संस्थेच्या थकबाकीबाबत खोटा दाखल देखील निवडणूक अधिकारी यांना दिला आहे.
तसेच सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत नाझरे कप गावावर झालेल्या उमेदवारी संदर्भात पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा ही देणार असल्याचे चिकने यांनी स्पष्ट केले.
यावेळी पुरंदर तालुक्यातील स्थानिक नेत्यांविषयी नाराजी व्यक्त करत माजी कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबत तसेच पक्षासोबत राहणार असल्याचे चिकने यांनी सांगितले.
------------------
गेली २५ वर्ष नाझरे कप उमेदवारी पासून गाव लांबच-------
गेल्या पंचवीस वर्षांपासून नाझरे कप गावाला संधी मिळाली नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवरून या गावाचा विचार होणे अपेक्षित होते मात्र या वेळीही गावाला डावलण्यात आले असल्याचे चिकने यांनी सांगितले.