सोमेश्वर कारखाना निवडणूक ! राष्ट्रवादीची यादी प्रसिध्द होताच नाराज भाजपाच्या गोठात : भाजपची यादी लांबणीवर

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम--- -

बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत सोमेश्वर परिवर्तन ची उमेदवारांची यादी प्रसिद्ध होताच कार्यकर्त्यांच्यात नाराजीचा सुरू उमटला असून अनेक नाराजांनी थेट भाजप पुरुस्कृत सोमेश्वर परिवर्तन पॅनेलचे प्रमुख दिलीप खैरे यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे आज सायंकाळी भाजपची प्रसिद्ध होणारी यादी उद्या सकाळी ९ वाजता जाहीर होणार आहे.
             सोमेश्वर कारखान्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या काल बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ४७५ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन आज सायंकाळी २१ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. आज सायंकाळी सहा वाजता भाजप पुरुस्कृत सोमेश्वर परिवर्तन पॅनेलची यादी प्रसिध्द होणार होती. मात्र तिकीट न मिळालेल्या राष्ट्रवादीच्या अनेक नाराजांनी भाजपचे दिलीप खैरे यांच्याशी संपर्क साधून यादी जाहीर करण्याची घाई करू नका त्यामुळे भाजपची यादी उद्या दि ४  सकाळी ९ वाजता प्रसिद्ध होणार आहे
To Top