भोर ! खुनाची शिक्षा भोगूण जामिनावर बाहेर आलेल्या एकाचा खून : आरोपी फरार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- 
भोर : प्रतिनिधी

शहरातील सम्राट चौक परिसरात दि.२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २३ वर्षीय तरुणाचा खून झाला असून,खून करून चार आरोपी फरार झाल्याची घटना घडली आहे.आनंद गणेश सागळे रा.नागोबा आळी सध्या रा.पुणे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून याबाबत त्याची आई वर्षा गणेश सागळे यांनी भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.मयत आनंद सागळे हा २०१९ मध्ये प्रकाश पवार यांचे खून प्रकरणी शिक्षा भोगून एक वर्षापासून जामिनावर बाहेर आहे.
         याबाबत हकीकत अशी आनंद गणेश सागळे दि.२ ऑक्टोबर रोजी पुण्याहून रात्री १०:३० वाजता मित्राच्या वाढदिवसाला जातो असे आईला सांगून भोरला आला होता.आनंद याने आपला मित्र आकाश दत्तात्रय मोरे रा.नागोबा आळी याला फोन करून दारू आणण्यासाठी जायचे आहे असे म्हणून सम्राट चौक परिसरात बोलावून घेतले.या परिसरात अगोदरच सनी सुरेश बारंगळे रा.सम्राट चौक ,अमीर महंमद मणेर ,समीर महंमद मणेर दोघेही रा.नवी आळी आणि सिद्धांत संजय बोरकर रा.स्टेट बँक जवळ ,वेताळ पेठ हे गाड्यावर दारू पीत बसले होते.यापैकी समीर याने आनंद सागळे याचे गळ्यात हात टाकून तू लय मोठा झालाय का असं म्हणत धक्काबुक्की केली. दोघांच्या बाचाबाचीत मोटारसायकल खाली पडली. तद्नंतर सनी बारंगळे व संजय बोरकर यांनी आनंद सागळे यास धरले.अमीर मणेर याने हातातील दगडाने मारण्यास सुरुवात केली. या घटनेने घाबरलेला आकाश मोरे या ठिकाणाहून पळून गेला. तर चौघा आरोपींनी  बियर बाटली ,धारदार शस्त्र ,तसेच दगडाने आनंद याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर वार करून गंभीर जखमी केले यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. खून करून फरार झालेल्या चारही आरोपींची छायाचित्र भोरचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी प्रसिद्ध केली असून आरोपी दिसल्यास भोर पोलिस ठाण्याशी (०२११३)२२२५३३ क्रमांकावर नागरिकांना संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल साबळे,शिवाजी सांगळे,पोलिस कॉन्स्टेबल अमोल मूर्हे दामिनी दाभाडे,राहुल मखरे करीत आहेत.
To Top