राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मोफत हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे उदघाटन

Pune Reporter

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते  मोफत हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे उदघाटन

 

        बारामती दि. 9 :राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे  मोफत हृदयरोग तपासणी, शस्त्रक्रिया व  रक्तदान शिबीराचे उदघाटन करण्यात आले.

            यावेळी  गट विकस अधिकरी विजय कुमार परिट, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय इंदापूर डॉ. सुहास शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गावडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत बोबाटे, श्रवणविकार तज्ज्ञ  डॉ. शगुप्ता,                तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सरतापे, ग्रामीण रुग्णलय निमगाव केतकी अधीक्षक डॉ. व्यवहारे, डॉ. चंदनशिवे आदी उपस्थित होते.

            यावेळी श्री. भरणे म्हणाले ,  कोकीलाबेन धिरुबाई अंबानी हॉस्पीटल मुंबई यांच्या सहकार्याने होणारा हा एक स्तुत आणि चांगला उपक्रम आहे. तालुक्यातील शुन्य ते 18 वयोगटातील बालकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी खूप खर्च येत असतो आणि तो सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरील असतो. ग्रामीण भागातील गरीब व वंचित नागरिकांना अशा उपक्रमाचा फायदा होणे आवश्यक आहे.  जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी याचा फायदा करुन घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सध्याच्या परिस्थितीत रक्तदानाची गरज आहे. नागरिकांनी रक्तदानाकरीता सहभाग नोंदवणे आवश्यक असून  रक्तदानाकरीता सर्वच यंत्रणानी प्रयत्न करावे असेही त्यांनी सांगितले.

            यावेळी कोरोना काळात चांगली कामगिरी करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार श्री. भरणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.  

            शासनाकडून प्राप्त झालेल्या तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण श्री. भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण रुग्णलय भीगवण, ट्रॉमा केअर सेंटर भिगवण आणि ग्रामीण रुणालय बावडा येथे प्रत्येकी एक रुग्णवाहिका देण्यात आली.

To Top