सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर साखर कारखान्याचा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून दोन्ही पक्ष्याकडील मतदारांच्या गाठीभेटी आणि आली बघ कपबसी ....आली बघ शिट्टी....लाऊडस्पीकर लावून धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रचारात रंगत आली आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या प्रचाराचा रणसंग्राम दि ६ पासून सुरू झाला आहे. प्रचाराला अवघे ५ दिवस मिळाले असून अवघे २ दिवस बाकी राहिले आहेत. राष्ट्रवादी आणि भाजप दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी पायाला फिंगरी बांधून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयन्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलने तसेच भाजप पुरुस्कृत सोमेश्वर परिवर्तन पॅनेलने गावदौरे व मतदारांच्या वयक्तिक गाठीभेटीवर भर दिला आहे. निवडणुकीचे उमेदवारीचे अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ४३० जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत त्यामुळे २० जागांसाठी आता तब्बल ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. तत्पूर्वी ब गटातून राष्ट्रवादी च्या सोमेश्वर विकास पॅनेलची एक जागा बिनविरोध झाली आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागांसाठी तब्बल ६३१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामधील ९६ जनांचे उमेदवारी अर्ज अपात्र झाले होते. उर्वरित ५३५ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कृती समिती व भाजप या उमेदवारांचा समावेश आहे. शनिवारी बारामती या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडल्या. त्यानंतर परवा रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली उमेदवार यादी जाहीर केली. दरम्यान राष्ट्रवादीच्या यादीवर काही नाराजांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले नसल्याचे चित्र आहे. तर काही गावातून फ्लेक्स च्या माध्यमातून मतदानावर बहिष्कार टाकला आहे.