सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक सन २०२० - २१ ते २०२५-२६ कारखाना निवडणूकीसाठी मी सोमनाथ कृष्णा मदने संचालक पदासाठी निंबूत खंडाळा गट नं. १, अपक्ष उमेदवार म्हणून उभा असुन माझी खूण " किटली "असून निवडणूक लढविण्याचे कारण स्पष्ट करू इच्छितो की, मी १९९७ पासून पार्टीकडे संचालक पदासाठी आज पर्यंत प्रत्येक पंचवार्षिक वेळी मागणी करून ही काही हितसंबंधी मंडळी यांनी माझ्या विषयी १९९७ ते २०२१ पर्यंत नेत्यांना चिट्या चपाळ्या देवून व नको ते आरोप करून मला उमेदवारी देण्यापासून आजपर्यंत वंचित ठेवलेले आहे.
तेव्हा मी प्रामाणिकपणे पार्टीचे काम करीत राहिलो तसेच मी अनेकदा कोणतीही चूक न करता, काही जनांच्या शिफारशीही नेत्यांच्याकडे केल्या असताना काहीना ४ वेळा संधी मिळाली व काहीना जिल्हा परिषद व सोमेश्वर संचालक २ वेळा, पंचायत समितीसाठी शिफारस करूनही ह्याच मंडळीनी माझे जाणूनबाजून राजकीय, चारित्र हनन कसे होईल याकडे लक्ष्य केंद्रित केले. आजही हि मंडळी हेच काम करीत आहोत. तेव्हा मी त्यांच्याविषयी मनामध्ये कसलाही द्वेष करीत नसताना हि मंडळी असे का करतात, वागतात हे मलाच कळेना असे असताना मी या अन्यायविरुध्द अपक्ष निवडणूक लढविण्याचे ठरविले असुन सभासद बंधू व भागिनीनों तुम्हीच वरील सर्व गोष्टींचा विचार करून मला तुमच्याकडून न्याय हवा.
तेव्हा सभासद बंधु आणि भागिनीनों हा न्याय मी तुमच्याकडे मागत असून तो तुम्ही संधी दिल्यास मी तुमचे प्रश्न संचालक बोर्डात निर्भयपणे मांडील अशी खात्री देतो.
तेव्हा येत्या १२/१०/२०२१ रोजी होणाऱ्या निवडणूकीत तुमचे बहुमोल असे मत मला देवून प्रंचड मंतानी विजयी करावे हि विनंती.