वैचारिक संपत्ती वाचनाने वाढते : त्यामुळे प्रत्येक घरात देवघराबरोबर पुस्तक घर असावे - प्रा रवींद्र कोकरे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी

"वैचारिक श्रीमंती ही धन संपत्ती पेक्षा वाचनाने घडते. आपल्या प्रत्येकांच्या घरात देवघरा बरोबरच पुस्तक घर असावे. वाचन हे  सांस्कृतिक वैभव असून त्यानेच आपले जीवन समृद्ध  होणार. पुस्तकांची मैत्री सा-या  नात्यातील श्रेष्ठ आहे".  असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष व ग्रामीण कथाकार प्रा.रवींद्र कोकरे यांनी केले.
    जय तुळजा भवानी शारदिय महोत्सव अहिल्यानगर (पणदरे) येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचन संकल्प पार पडला. नवरात्रीत डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्तानं पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना पुस्तक , वह्या व लेखणी भेट देऊन त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव दिला.
      "वाढदिवस केक न कापता फळे कापून व पुस्तक भेट देऊन मंडळाने उपक्रम सुरु केला आहे. योगासने , प्राणायाम यासह हास्यदान सुरु आहे. हळदी कुंकू यातून महिलांचे विचार प्रदान सह मनमोकळे मनोगत दिशादर्शक आहे.शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम , अन्नदान यासह गुणवंताचा सत्कार असे आयोजन केले होते." प्रा रवींद्र कोकरे यांनी म्हटले आहे.
    कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक , महिला, युवक , युवती यांची उपस्थिती कोरोनाचे नियम पालन करुन होती.
To Top