ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित मार्गी लावणार - नवनिर्वाचित संचालक ऋषी गायकवाड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

श्री सोमेश्वर कारखाना ६० वा गळीत हंगामाचा शुभारंभ नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला असून सोमेश्वर करखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गळपासाठी येणार आहे.. एक महिन्यापासून सोमेश्वर परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे अनेक  शेतकऱ्यांच्या  शेतातील रस्त्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहे, बारामती तालुक्यातील वाकी रविवार दि १७ रोजी  ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस वाहतूक समस्या ची पाहणी नवनिर्वाचित संचालक गायकवाड यांच्या पुढे मांडल्या त्या समस्यांचे मी नक्कीच सोमेश्वर कारखाना संचालक बोर्ड मध्ये मांडत पूर्णत्वाला नेईल असाही शब्द नवनिर्वाचित संचालक गायकवाड यांनी दिला.
          यावेळी वाकी गावचे सरपंच किसन बोडरे, ग्रामपंचायत सदस्य इंद्रजीत जगताप, दूध संघाचे मा. चेअरमन विलास जगताप ,तंटामुक्ती मा. अध्यक्ष कुंडलिक जगताप, दत्तात्रय जगताप, हनुमंत खामकर,चोपडज गावचे उपसरपंच तुकाराम भंडलकर, सदस्य , सागर गाडेकर , प्रा बाळासो गाडेकर  ,करंजेपुल  उपसरपंच निलेश गायकवाड , विदित्य इंजिनियर होळकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुंडलिक भाऊसाहेब यांनी केले तसेच आभार इंद्रजित जगताप केली यांनी केले .
To Top