'सोमेश्वर'च्या बाजूची खाजगीकरणाची वाळवी थांबवण्याची गरज - दिलीप खैरे : सोमेश्वर परिवर्तन प्रचार शुभारंभ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

विकासाच्या नावाखाली सत्ताधारी  पाठ थोपटून घेण्याचं काम करत आहेत. पण सतत अनेक वर्षे कमी दर घेऊन कर्ज फेडण्याचे काम सभासदांनी केलं आहे याचं खरं श्रेय सभासदांना आहे. असे सांगून संधी दिल्यास गुजरात च्या धर्तीवर सोमेश्वरचे एक आदर्श मॉडेल उभे करू असे आश्वासन सोमेश्वर परिवर्तन पॅनलचे प्रमुख दिलीप खैरे यांनी दिले. 
               आज सोमेश्वरनगर येथे सोमेश्वर मंदिरात सोमेश्वर परिवर्तन पॅनेलच्या प्रचार नारळ शुभारंभी ते बोलत होते. यावेळी भाजपा बारामती तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे, पी के जगताप, बाळासाहेब भोसले, आदिनाथ सोरटे, हनुमंत शेंडकर, इंद्रजित भोसले, नाना गायकवाड, सुशांत सोरटे, बबलू सकुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. खैरे पुढे म्हणाले, गेली अनेक वर्षे सभासदांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सहकार चळवळ वाचवण्यासाठी सभासदांचे पॅनेल उभे केले आहे.उसउत्पादकांच्या हक्कांसाठी या निवडणुकीत हे पॅनल उभे केले आहे. आपल्या नेत्यांचा बाल हट्ट पुरवायला खिशातून पैसे काढून डीफर्ड खर्चात भरले हे दुर्दवी बाब असल्याचे सांगून नेते कशावर बोलतात..तर 
डोक्यावरील केस, नाराज होऊ नका, दुसरीकडे तिकीट देतो, शेतकऱ्यांविषयी त्यांना काही घेणे देणे नाही. छत्रपती कारखाना कोणाकडे आहे. त्याची अवस्था काय करून ठेवली आहे. माळेगाव च्या  मागील संचालक मंडळाने ३४०० रुपये दर दिला आज ऊस दराबाबत काय अवस्था आहे. सोमेश्वर ची सत्ता  गुजरात च्या धर्तीवर सोमेश्वर ला राज्यात आदर्श दर देणारा कारखान्याचे मॉडेल उभं करू असे खैरे यांनी सांगितले.  
         पी के जगताप म्हणाले, वसंतकाका जगताप यांनी चांगले काम केले, कोणताही भ्रष्टाचार नाही. कधी सतेचा उन्मात केला नाही, सत्तेत उन्मात न करता कारभार कसा करावा हे  संस्थापक  मुगुटआप्पा काकडे, बाबालाल काकडे व वसंतकाका जगताप यांच्याकडून शिकावे. असे सांगून संचालक मंडळात शिकलेली माणसं घेणे गरजेचे आहे. हजारो कोटीचे खाजगी  व्यवसाय असणारी माणसे सहकाराच काय भलं करणार?  शिकलेली माणसं संचालक झाली तरच सहकार टिकेल तर भाजप बारामती तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे म्हणाले, काल तालुक्यात चर्चा दोनच होत्या एक म्हणजे विरोधी पॅनेल होतय का नाही आणि दुसरी वाघळवाडीच्या केळच्या फ्लेक्सची ....खाजगी वाले जर सहकार चालवायला लागले तर सहकार चांगला दर कसा देणार अशी टीका करून भाव मिळावा असे वाटत असेल तर दोन्ही पैकी एक कारखाना विरोधात पाहिजे तरच शेतकऱ्यांचे भले होईल. 
....-------------------
आमची शिट्टी प्रस्थपितांच्या  शिट्ट्या वाजवणार---------
या निवडणुकीत प्रचाराला अवघे पाच दिवस मिळाले आहेत. त्यामुळे कार्यक्षेत्रातील १५२ गावातील मतदारांपर्यंत पोहोचणे अवघड आहे.परिवर्तन पॅनेलला शिट्टी चिन्ह मिळाले आहे. मात्र आमची शिट्टी प्रस्थपितांच्या शिट्ट्या वाजवल्याशिवाय राहणार नाही असे पी के जगताप यांनी सांगितले.
To Top