पवार कुटुंबियांवर खोटेनाटे आरोप करणाऱ्यांनी सहकारी संस्था कशा चालवण्याच्या हे पवार कुटुंबियांना शिकवू नये : पुरुषोत्तम जगताप

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

अजितदादांनी सोमेश्वर कारखान्याच्या कर्जमुक्तीसाठी आमदारकी पणाला लावली होती. सभासदांच्या सहकार्याने कर्जमुक्त होत राज्यात चांगला दर दिला आहे. १२.८ टक्के उताऱ्याला राज्यात ३१०० रुपये असा उच्च दर दिला आहे.असे सांगून ज्यांनी राज्यात सहकाराच जाळ निर्माण केलं आशा कुटुंबावर काही लोक खोटे नाटे आरोप करत आहेत. त्यांनी पवार कुटुंबाला सहकार शिकवू नये अशी टीका  सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिला.
         श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान (ता. बारामती) येथे राष्ट्रवादी प्रणित सोमेश्वर विकास पॅनलच्या प्रचाराचा आज माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी संभाजी होळकर, प्रमोद काकडे, सतीश खोमणे, विश्वास देवकाते, सतीश काकडे, डॉ. दिगंबर दुर्गाडे, राजवर्धन शिंदे, नीता फरांदे, माणिक झेंडे, प्रदीप पोमण उपस्थित होते.  जगताप पुढे म्हणाले,  सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून पंधरा हजारात सभासदांच्या मुलांना इंजिनिअर होता आले, नवीन कोर्सेस सुरू केले, बसभाड्यात विद्यार्थ्यांना सवलत दिली. कामगार आरोग्य विमा, सभासद अपघात विमा योजना राबविल्या असल्याचे जगताप यांनी सांगितले. 
         शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे म्हणाले, अजितदादांवरील विश्वासामधून युती झाली. एकत्र काम करणार आहोत. कृती समितीला काही जागा हव्यात म्हणून उमेदवारीबाबत थोडी नाराजी होती. पण काही बाबतीत आंनदही वाटला. दादांच्या निरोपानंतर आमची मुंबईत बैठक झाली. घरातील उमेदवार द्या असे दादा म्हणाले. तालुक्याच्या, राज्याच्या विकासात ह्या नेत्याची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. इथून पुढे सुद्धा दादांसोबत राहणार. पॅनेल टू पॅनेल मतदान करा. कारखान्याबाबत चांगल्या स्थितीत आहोत. कारखाना सोडून कायम तुमच्यासोबत राहू. चांगल काम केलं तर सोबत राहू पण भविष्यात चुकलं तर तडजोड नाही. काही अडचण आली तर अजितदादा आहेत. बाजू बरोबर असेल तर त्यांच्याकडून कुणाला सुट्टी नसते. 
        जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे म्हणाले, भाजपच्या कारखान्यांच्या भावाशी सोमेश्वरची तुलना करूनच मग बोलावे असे आव्हान दिले. माजी आमदार अशोक टेकवडे, शहाजी काकडे, दत्ताजी चव्हाण, दत्ता झुरंगे, अशोक खलाटे, ज्ञानेश्वर कौले, राजेंद्र जगताप, योगेश जगताप, गुलाब देवकाते यांनी मनोगत व्यक्त केले.
--------------------
 आमचा एक उमेदवार घेतला तर आम्ही बिनविरोध करू असा निरोप विरोधी पॅनेलकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांचेकडे आला असल्याचा आरोप बारामतीचे मा नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी केला
To Top