सभासदांनी मतांचा एवढा बोजा टाकला की मी वाकलो नाही तर झोपलोच : अजित पवार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
काल झालेल्या मोजणीच्या मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलला ९० टक्के मते दिली
 काही विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट देखील जप्त झाले. मी तुमच्या मतांच्या बोजाने वाकलो पाहिजे असे आवाहन केले होते. मात्र तुम्ही एवढी मते दिली की तुमच्या मतांच्या बोजाने मी वाकलो नाही तर झोपलोच अशी मिश्कीली अजित पवार यांनी केली. 
          सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६० व्या गव्हाण पूजन व गळीत हंगाम शुभारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी आमदार संजय जगताप, विश्वास देवकाते, प्रमोद काकडे,  संभाजी होळकर, सतीश काकडे, शहाजी काकडे, दत्ता झुरंगे, नीता फरांदे, दत्ताजी चव्हाण, संदीप जगताप, संजय भोसले, सचिन सातव, भरत खैरे, राहुल वाबळे, शैलेश रासकर, विजय कोलते, दिगंबर दुर्गाडे उपस्थित होते.
To Top