विरोधकांच्या चुकिच्या प्रचाराला सभासदांकडून मतदानाच्या माध्यमातून खडखडीत उत्तर : पुरुषोत्तम जगताप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---------

 हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न राहणार आहे. १५ लाख नोंदीचा तर साडेतीन लाख बिगर नोंदीचा ऊस आहे. गळपाचे आव्हान राहणार आहे. १८ तारखेला कारखाना सुरू करणार आहोत. विस्तारीकरण डिसेंबर अखेर पूर्ण होणार असून ८ हजाराचे प्रतिदिन गाळप करणार आहोत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विरोधकांकडून चुकीचा प्रचार केला. त्याला सभासदांनी मतदानातून खडखडीत उत्तर दिले आहे.
          सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६० व्या गव्हाण पूजन व गळीत हंगाम शुभारंभात जगताप  बोलत होते. यावेळी आमदार संजय जगताप, विश्वास देवकाते, प्रमोद काकडे,  संभाजी होळकर, सतीश काकडे, शहाजी काकडे, दत्ता झुरंगे, नीता फरांदे, दत्ताजी चव्हाण, संदीप जगताप, संजय भोसले, सचिन सातव, भरत खैरे, राहुल वाबळे, शैलेश रासकर उपस्थित होते. 


To Top