सोमेश्वर रिपोर्टर टीम;---------
खंडाळा : प्रतिनिधी
खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून राजकारण चांगलेच तापू लागले असून दोन्ही बाजूकडून आरोप प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडू लागल्या आहेत.
खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्यासाठी येत्या सतरा तारखेस मतदान होणार असून दोन्हीकडून प्रचाराचा जोर शिगेला पोहचला आहे. सत्ताधारी संस्थापक सहकार पॅनलवर खंडाळ्यातील शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या प्रचार सभेत आमदार मकरंद पाटील यांनी कठोर टिका करत मदन भोसलेंसह शंकरराव गाढवेंवरही ताशेरे ओढले होते. आज त्या टिकेला लोणंद येथे किसनवीरचे चेअरमन मदन भोसले यांनी प्रत्युत्तर देताना "आम्ही कारखाना उभा केलाय... आम्ही उभारणारे आहोत. मोडून खाणारे तर तुम्ही आहात " असे म्हणत पलटवार केलाय. कारखाना चालवण्याची चिंता तुम्ही करू नका असे सांगत जेष्ठ नेते शंकरराव गाढवे यांच्या नेतृत्वाखालील बालसिद्धनाथ शेतकरी संस्थापक सहकार पॅनलला भरघोस मतदान करण्याचे आवाहन त्यांनी सभासदांना केले.
एका बाजूला कारखाना चालवणारे , ऊभा करणारे आहेत तर दूसऱ्या बाजूला कारखाना मोडून खाणारे आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांनी कारखाना उभारण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे कोणी कितीही देखावे केले ,मोठमोठे मेळावे घेतले, जेवणावळी घातल्या तरी शेतकरी सभासद या भुल-भुलैयाला भूलणार नाही आणि शंकरराव गाढवेंच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील याची मला खात्री असल्याचे पुढे बोलताना मदन भोसलेंनी सांगितले.
COMMENTS