सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
लहुजी शक्ती सेना या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा कोअर कमिटीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी मुरुम (ता. बारामती) येथील राजेंद्र भिसे यांची निवड करण्यात आली आहे. बारामती येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कसबे व संघटनेचे नेते कैलास सकट यांच्या प्रमुख उपस्थितीत भिसे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळातील अडचणी व प्रश्न हे प्रशासनासमोर मांडून समाजाला न्याय मिळवून देणार असल्याचे व गाव तेथे लहुजी शक्ती सेनेच्या शाखा उघडणार असल्याचे भिसे यांनी निवडीनंतर सांगितले.