सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष शैलेश रासकर यांनी आपला दोन वर्षाचा एक लाख रुपये 'मासिक भत्ता' प्राजक्ता मतिमंद विद्यालय आणि खंडोबाचीवाडी येथील खंडोबा देवस्थान समिती यांना प्रदान केला.
सोमेश्वर कारखान्याच्या अभ्यास दौऱ्यादरम्यान दोन वर्षांपूर्वी कामगार कल्याण अधिकारी दत्ता माळशिकारे यांनी रासकर यांना तालुक्यातील वंचित संस्थाना, व्यक्तींना आर्थिक मदतीची गरज असल्याचे सांगितले होते. त्यानुसार रासकर यांनी गेले दोन वर्ष मासिक सभेचा आर्थिक स्वरूपातील मानधनरूपातील भत्ता उचलला नाही. तो साठवून एक लाख रुपये झाला होता. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार सोमेश्वर कारखान्यावर कार्यक्रमानिमित्त आले होते. पवार यांनाही रासकर यांची ही कल्पना पसंत पडली. समाजातील गरजूंना मदतीची भूमिका कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
पवार यांच्याच हस्ते सुपे येथील मतिमंद मुलांच्या निवासी विद्यालयाचे संस्थापक जयराम सुपेकर यांना पन्नास हजारांचा तर खंडोबाचीवाडी येथे सुरू असलेल्या खंडोबा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी बाबा फरांदे यांना पन्नास हजारांचा धनादेश प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर उपस्थित होते.
---
COMMENTS