सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील दोघा भावांना जुन्या भांडणाच्या वादातून आठ जणांच्या टोळक्याने शिवीगाळ, दमदाटी करत काठीने मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे तेजस रमेश चव्हाण, विनय हरिभाऊ चव्हाण, शुभम भूकणे, शुभम राऊत, शुभम बाळासाहेब चव्हाण, सोन्या गायकवाड, मोन्या गायकवाड, महेश आढाव या आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिक्रापूर येथील आकाश जाधव हा युवक घरामध्ये असताना त्याला घराबाहेर काही युवकांच्या भांडणाचा आवाज आल्याने त्याने घरातून बाहेर येऊन पाहिले. यावेळी त्याला घराच्या बाहेर उभा असलेला त्याचा भाऊ राजेश याला काही युवक जुन्या भांडणाच्या वादातून मारहाण करत असल्याचे दिसले. आकाश हा भांडणे सोडविण्यासाठी गेला असता मारहाण करणाऱ्या युवकांनी त्याला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ करुन दमदाटी करत हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत आकाश रोहिदास जाधव (वय २७ वर्षे रा. बाजार मैदान जवळ शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी तेजस रमेश चव्हाण, विनय हरिभाऊ चव्हाण, शुभम भूकणे, शुभम राऊत, शुभम बाळासाहेब चव्हाण, सोन्या गायकवाड, मोन्या गायकवाड, महेश आढाव (सर्व रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस हे करत आहेत.